WTC 2020 : भारतीय संघ पहिल्या डावात 217 धावांवर ऑल आऊट

एमपीसी न्यूज – वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या न्यूझीलंड विरुद्धच्या फायनलमध्ये भारताने पहिल्या डावात सर्व बाद 217 धावा केल्या. न्यूझीलंड कडून कायले जेमिन्सनने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वाधिक 49 धावा केल्या.

दुसऱ्या दिवशी भारताने 3 बाद 146 धावा पर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या दिवशी कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांनी डावाची सुरुवात केली. विराट कोहली 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर पंत देखील 4 धावांवर माघारी परतला. उपकर्णधार अजिंक्य रहाणे चांगल्या लयीमध्ये दिसत होता. त्याचे अर्धशतक 1 धावाने हुकले. रहाणेच्या जागी आलेल्या आर अश्विनने वेगाने धावा केल्या. तो 27 चेंडूत 22 धावा करून बाद झाला.

अश्विनच्या जागी आलेला इशांत चार धावांवर बाद झाला. इशांत बाद झाल्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर काइलने जसप्रीत बुमराहला शून्यावर बाद केले. काइलला हॅटट्रिक घेण्याची संधी होती. पण मोहम्मद शमीने हॅटट्रिक चेंडूवर चौकार मारला. ट्रेंट बोल्टने रविंद्र जडेजाला 15 धावांवर बाद करत भारताचा पहिला डाव 217 धावात संपुष्ठात आणला.

न्यूझीलंडच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंड कडून कॉनवे (10) आणि लॅथम (12) मैदानावर खेळत असून संघाच्या धावा 22 झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.