XI Addmission: अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत 40 हजार 13 विद्यार्थ्यांना प्रवेश

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.31) सकाळी दहा वाजल्यापासून गुरूवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालय आणि उच्च माध्यमिक शाळांमधील ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिली नियमित गुणवत्ता यादी रविवारी (दि.30) जाहीर करण्यात आली. यात कला, वाणिज्य, विज्ञान आणि एचएसव्हीसी या शाखेतील अभ्यासक्रमासाठी 40 हजार 13 विद्यार्थ्यांना पहिल्या फेरीतून प्रवेश देण्यात आला.

अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी यावर्षी 73 हजार 685 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे. त्यातील 68 हजार 72 अर्ज पात्र ठरले आहेत. पहिल्या फेरीत 28 हजार 59 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकलेला नाही.

पहिल्या फेरीत सुमारे 19 हजार 575 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले तर, जवळपास सहा हजार 702 विद्यार्थ्यांना त्यांच्या दुसऱ्या पसंतीक्रमाचे महाविद्यालय मिळाले आहे. मिळाला.तिसऱ्या पसंतीक्रमानुसार 4 हजार 174, चौथ्या पसंतीक्रनानुसार 2 हजार 840, पाचव्या पंसतीने 2 हजार 138, सहाव्या पसंतीने 1 हजार 503, सातव्या पसंतीने 1 हजार 66, आठव्या पसंतीने 844, नवव्या पसंतीने 629, दहाव्या पसंतीनुसार 542 विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी महाविद्यालय मिळाले.

इयत्ता अकरावीच्या केंद्रीय प्रवेशाच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी (दि.31) सकाळी दहा वाजल्यापासून गुरूवारी (दि.3) सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रवेश घेता येणार आहेत.

जात संवर्गाच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो. यात खुल्या प्रवर्गातील 14 हजार 943 विद्यार्थ्यांचा सर्वाधिक प्रवेशात समावेश आहे. कोटा प्रवेशानुसार एकूण 6 हजार 227 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. यात सर्वाधिक इनहाऊस कोट्यातून 4 हजार 131 प्रवेश निश्चित झाले. कोटा प्रवेशातील 17 हजार 771 जागा अद्यापही रिक्त आहेत.

विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रोसिड फॉर ऍडमिशन या सुविधेचा काळजीपूर्वक वापर करावा. याबाबत अधिक माहिती www.dydepune.com आणि https://11thadmission.org.in/ संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.