XI CET : अकरावी सीईटी परिक्षेसाठी अर्ज करण्याचे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद

एमपीसी न्यूज – दहावीचा निकाल नुकताच जाहीर झाला, त्यानंतर अकरावी प्रवेशासाठी सीईटी परिक्षा 21 ऑगस्ट रोजी घेतली जाणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला मात्र, आज दुसऱ्याच दिवशी सीईटी परिक्षेसाठी अर्ज करण्याचे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद राहणार असल्याचे मंडळाने सांगितले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव अशोक भोसले यांनी याबाबत एक प्रकटन प्रसिद्ध केले आहे. यामध्ये सीईटी परिक्षेची http://cet.mh-ssc.ac.in हे संकेतस्थळ तांत्रिक कारणास्तव बंद राहणार असल्याचे मंडळाने म्हटले आहे. संकेतस्थळ किती दिवस बंद राहणार याबाबत माहिती देण्यात आली नसून, सुविधा पूर्ववत झाल्यानंतर माहिती दिली जाईल असे प्रकटनात म्हटले आहे.

दरम्यान, मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली होती 26 जुलै पर्यंत अर्ज करण्यास मुदत देण्यात आली आहे. मात्र, संकेतस्थळ बंद राहणार असल्यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती प्रकटनात देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.