Vadgaon Maval : नागरिकांना वाहतुकीच्या नियमांची माहिती आणि ताकीद देण्यासाठी वडगांव येथे अवतरले साक्षात यमराज

भारतीय जनता पार्टीद्वारे अभिनव उपक्रमातून जनजागृती

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ – वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, हेल्मेट न वापरणे, दुचाकी वाहनावर एकाच वेळी तिघांनी प्रवास करणे, सीट बेल्ट न लावणे, वाहन अतिवेगात चालविणे, दुचाकी चालविताना मेसेज वाचणे, विनाकारण कर्कश्श हॉर्न वाजविणे, पायी चालताना लहान मुलांना रस्त्याच्या आतील बाजूस ठेवून चालणे या व अशा अनेक वेगवेगळ्या वाहतुकीच्या नियमांची नागरिकांना माहिती देण्यासाठी आणि या नियमांचे उल्लंघन केल्यास प्रसंगी जीवावर बेतणाऱ्या घटनांची सख्त शब्दांत माहिती देण्यासाठी ज्युनियर यमराज वडगांव मावळ येथे अवतरले होते.

याप्रसंगी मावळ भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, वडगांव भाजप अध्यक्ष किरण भिलारे, कार्याध्यक्ष प्रसाद पिंगळे, सचिव रविंद्र म्हाळसकर, ज्येष्ठ नेते नारायण ढोरे, दीपक बवरे, विवेक धर्माधिकारी, नगरसेवक अॅड.विजय जाधव, किरण म्हाळसकर, शामराव ढोरे , माजी सरपंच संभाजी म्हाळसकर, दीपक पवार, महिला मोर्चा अध्यक्ष धनश्री भोंडवे, युवा मोर्चा अध्यक्ष रमण ढोरे, शंकर भोंडवे, सुनील कुडे, अतुल म्हाळसकर, प्रकाश बोत्रे, महेश म्हाळसकर, रोहन सुतार, अश्विनी बवरे, संगिता खेंगले, सुनीता जाधव, शैला शिंदे, सुवर्णा गाडे, शितल मुथा, पद्मावती ढोरे, श्रेया भंडारी, भगवान कुडे, अरुण सुळके आदी मान्यवर उपस्थित होते.

अनेक वाहन चालकांना रस्त्यात भेटून त्यांनी या गोष्टींबाबत गंभीर आणि विनोदी शैलीत प्रबोधन केले. यामध्ये स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबाचा वाहन प्रवासादरम्यान सुरक्षिततेचा फायदा असल्याने वाहनचालकांनी देखील त्यांच्या चुका स्विकारून भविष्यात वाहतुकीचे नियम तंतोतंत पाळण्याची खबरदारी घेण्याचे मान्य केले.

नियम पाळणाऱ्या वाहन चालकांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान देखील करण्यात आला. अनेकांनी या अनोख्या पाहुण्यासोबत सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली होती. श्री पोटोबा मंदिराबाहेर भारतीय जनता पक्ष वडगांव शहर आणि युवा मोर्चा, विद्यार्थी मोर्चा यांच्या आयोजनातून आणि भारतीय जनता पक्ष व्यापारी मोर्चा आणि महिला मोर्चा यांच्या संकल्पनेतून आणि या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले.

विठ्ठल घारे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. स्थानिक कलाकार श्रीधर कुलकर्णी यांनी यमराजाची भूमिका वठवली आणि इतर कलाकार सहकाऱ्यांच्या भूमिकेत आदित्य धामणकर, ह्रितीक पाटील हे होते, रंगभूषा अनुजा झेंड यांनी केली. नागरिकांनी या अभिनव उपक्रमाचे कौतुक केले. सूत्र संचालन अनंता कुडे यांनी केले, आभार प्रदर्शन भूषण मुथा यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.