Nigdi : यमुनानगरला पालिकेच्या ओपीडी सुरु करण्यासाठी लवकरच मुहूर्त

नगरसेवक  प्रा. उत्तम केंदळे यांचे यश

एमपीसी  न्यूज – यमुनानगर येथील सावित्रीबाई फुले सभागृहाच्या शेजारी महापालिकेच्या वतीने नव्याने बाह्यरुग्ण उपचार केंद्र सुरु होणार आहे. याबाबत नगरसेवक  प्रा. उत्तम केंदळे यांनी पाठपुरावा केला असून त्यास पालिकेने अनुकुलता दर्शविली आहे. 

सेक्टर 22 यमुनानगरला बाह्यरुग्ण ओपीडी आहे. पण यमुनानगर, साईनाथनगर, त्रिवेणीनगर, दुर्गानगर या प्रभागात मोठ्या प्रमाणात लोकसंख्या असल्याने सेक्टर 21मध्ये स्वतंत्र ओपी़डी सुरु करावी, अशी मागणी नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे यांनी मार्च 2017मध्ये महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व आरोग्य अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्याकडे केली होती. तसेच स्थापत्य विभागाकडे ही तीन ते चार रुम तयार करुन रुग्णसेवा सुरु करता येईल. असे सुचविण्यात आले होते. अखेर स्थानिक नगरसेवकांची अनेक वर्षाच्या मागणीनुसार येथे ओपीडी सुरु करण्यास महापालिकेने अनुकूलता दर्शविल्याने प्रा. केंदळे यांचे यश सार्थकी लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.