शुक्रवार, डिसेंबर 2, 2022

Pimpri News : यशवंतरावांनी उज्वल महाराष्ट्राची पायाभरणी केली – काशिनाथ नखाते  

एमपीसी न्यूज : यशवंतराव चव्हाण हे राज्याला पहिले आदर्श मुख्यमंत्री लाभले. सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या साऱ्याच अंगांनी नव्या देशाची पायाभरणी सुरू असताना त्यांनी योगदान दिले आहे .राज्याची अस्मिता जपून नवे आर्थिक स्त्रोत तयार करणे, (Pimpri News) सामाजिक उतरंडीत खाली राहिलेल्या वर्गांना नव्या रचनेत समान संधी मिळवून देण्याचे काम यशवंतराव चव्हाण यांनी केले असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले.

Pimpri News : संदीप पाठक यांनी मुलाखतीत उलगडला त्यांचा रांगडा बाज

कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र ,महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघ , महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार समिती तर्फे आज यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन करण्यात आले.(Pimpri News) यावेळी उमेश डॉर्ले, इरफान चौधरी, रमेश माळी, विष्णुपंत गुल्हाने ,अकबर शेख, निरंजन लोखंडे,सलीम डांगे, शीला गोराने, विमल दुनघव आदी उपस्थित होते.

 

Latest news
Related news