YCM Hospitals : विना परवाना गैरहजर राहिलेल्या सफाई कामगाराची वेतनाढ रोखली

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (YCM Hospitals) वायसीएम रूग्णालयातील 334 विना परवाना गैरहजर राहणा-या सफाई कामगाराची वेतनवाढ रोखली आहे. याबाबतचा आदेश अतिरिक्त आयुक्तांनी काढला आहे.

सुनिल रघुनाथ होळकर असे या सफाई कामगाराचे नाव आहे. होळकर हे ऑगस्ट 2019 ते डिसेंबर 2020 या कालावधीत तब्बल 334 दिवस विना परवाना गैरहजर राहिले. आरोग्य सेवा ही अत्यावश्‍यक सेवा असताना होळकर यांनी कामावर हजर राहिले नाहीत. याबाबत त्यांची विभागीय चौकशी करण्यात आली.

Innerwheel Club : पर्यावरण पूरक गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण उत्साहात

या चौकशीत होळकर दोषी आढळल्याने त्यांची (YCM Hospitals) एक वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तसेच यापुढे विना परवाना गैरहजर राहिल्यास, कार्यालयीन कामकाजात गैरवर्तन केल्यास शिस्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.