YCMH : किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांची माफक दरात तपासणी होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील (YCMH) मेडीसीन विभागात नव्याने सुरु करण्यात आलेल्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील आजारांवर अत्यंत माफक दरात तपासणी होणार आहे, अशी माहिती यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांनी दिली.

महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील मेडीसीन विभागात स्पेशालिटी क्लिनिक नव्याने सुरु करण्यात आले आहे. या क्लिनिकचे उद्घाटन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. यावेळी मेडीसीन विभागप्रमुख डॉ. प्रविण सोनी, सहयोगी प्राध्यापक डॉ. निरंजन पाठक, डॉ. नरेंद्र काळे व इतर विषयाचे सर्व विभागप्रमुख, सहयोगी प्राध्यापक, सहायक प्राध्यापक तसेच कनिष्ठ व वरिष्ठ निवासी डॉक्टर, मेट्रन आणि नर्सिंग स्टाफ उपस्थित होता.

Talegaon Dabhade : वयाची साठी उलटलेले वर्गमित्र 48 वर्षानंतर एकत्र

आजपासून वायसीएम रुग्णालयातील मेडीसीन विभागात (YCMH) सुरु झालेल्या स्पेशालिटी क्लिनिकमध्ये किडनीचे आजार, मधुमेह, पक्षघात व मज्जातंतू संदर्भातील रुग्णांची संबंधित आजारांवरील तज्ञ डॉक्टरांकडून पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या 10 रुपये या अत्यंत माफक दरात तपासणी होणार आहे. गरजू रुग्णांना अत्यंत माफक दरात या सेवेचा लाभ घेता येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.