Yerawada Crime News : फ्लॅट भाड्याने घेण्याच्या बहाण्याने घरमालकाची दीड लाखांची फसवणूक

एमपीसीन्यूज : फ्लॅट भाड्याने देण्याची जाहिरात करणे एका व्यक्तीला चांगलेच महागात पडले. समोरील व्यक्तीने लष्करात नोकरीस असून भाड्याने फ्लॅट घेण्याच्या बहाण्याने त्याची एक लाख 64 हजार रुपयांनी फसवणूक केली.

याप्रकरणी 53 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीतनंतर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी यांचा पिंपरी-चिंचवड परिसरातील रहाटणी येथे फ्लॅट आहे. हा फ्लॅट भाड्याने देण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ऍपवर जाहिरात केली होती. ही जाहिरात पाहूनच एका व्यक्तीने त्यांना फ्लॅट भाड्याने घ्यायचा आहे, असे सांगत फोन केला.

समोरील व्यक्तीने भारतीय सैन्य दलात नोकरीसाठी असल्याचेही सांगितले होते. तसेच फिर्यादीने सांगितल्याप्रमाणे रूम भाडे आणि डिपॉझिट देण्यासाठीही त्याची तयारी होती.

दरम्यान, समोरील व्यक्तीने रूम भाडे आणि डिपॉझिट ‘फोन पे’ व ‘पेटीएम’द्वारे पाठवण्यासाठी फिर्यादीना एक क्युआरकोड पाठवून तो स्कॅन करण्यास सांगितले. फिर्यादी यांनी समोरच्या व्यक्तीने सांगितल्यानुसार क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर फिर्यादी व त्यांच्या मुलाच्या खात्यातून एकूण 1 लाख 64 हजार रुपये
परस्पर काढून घेत फसवणूक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.