मंगळवार, जानेवारी 31, 2023

Yerawada News : मीटर जोरात पळतोय म्हणत रिक्षा चालकाला प्रवाशाकडून बेदम मारहाण

एमपीसी न्यूज : प्रवासी म्हणून रिक्षात बसलेल्यांनी (Yerawada News) मीटर जोरात पळत असल्याच्या कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण केली. येरवडा येथील गोल्फ क्लब चौकात 18 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. रिक्षा चालक प्रसाद छगनराव पालकर (वय 59) त्यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार मल्हार सुभाष पाटील यांच्या विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे रिक्षा चालक आहेत. 18 एप्रिल रोजी त्यांच्या रिक्षात सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास आरोपी मल्हार पाटील काही मित्रांसोबत बसले होते. कल्याणी नगर ते भोसले नगर असे जात असताना रिक्षा येरवड्यातील गोल क्लब चौकात आल्यावर आरोपीने फिर्यादीला मारहाण केली. रिक्षा दुसऱ्या रस्त्याने घेऊन चल असे म्हणून रिक्षाचा मीटर जोरात पडतो आहे असे बोलत फिर्यादीच्या कानाजवळ चार ते पाच बुक्क्या मारल्या. फिर्यादी रिक्षा चालवत असताना पाठीमागून त्यांना हाताने मारहाण केली.

या मारहाणीत फिर्यादी यांच्या डाव्या कानामागील (Yerawada News) नस फाटून डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने त्यांना बोलण्यास त्रास होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Hadapsar : पतीच्या निधनानंतर लग्नाचे आमिष दाखवून दिराचा महिलेवर बलात्कार

Latest news
Related news