Yerawada News : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी 21 वर्ष पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज : ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यासाठी (Yerawada News) पत्नीला 21 वर्ष पतीकडून मारहाण करण्याचा प्रकार समोर आला आहे. रविंदरसिंह भंवरसिंह राजपुरोहित (वय 43) असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याने 2001 साली ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे पत्नी आणि मुलांनीही धर्मांतरण करावे, अशी त्याची इच्छा होती. त्यासाठी तो पतीवर दबाव टाकत असे.

Pune News : “होय मला बॉयफ्रेंड आहे” या विषयावर मुक्ता चैतन्य यांचे मार्गदर्शन

त्याने घरातील देवाची मूर्ती आणि फोटो नदीत फेकून दिले होते. गेली 21 वर्ष तो (Yerawada News) आपल्या पत्नीला मारहाण करत असे. तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत असे. तसेच मुलांना ख्रिश्चन शाळेत टाकण्याचीही धमकी दिली होती. त्याच्या या जाचाला कंटाळून 43 वर्षीय पत्नीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
येरवडा पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.