Pune – होळकर पुलावरून उडी मारून प्रौढाची आत्महत्या

एमपीसी न्यूज –  पुण्यातील होळकर पुलावरुन उडी मारून येरवडा येथील सोनवणे नामक (वय अंदाजे 55 ) प्रौढाने आत्महत्या केली. ही घटना आज गुरुवारी (दि.1) घडली.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अग्निशमन दलाच्या जवानांना एक इसम नदीपात्रात बुडत असल्याची माहिती मिळताच त्यांनी तेथे जाऊन अथक प्रयत्नाने त्या इसमाला बाहेर काढले आणि तात्काळ ससून रुग्णालयात पाठविण्यात आले

रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले आहे.याप्रकरणी पुढील तपास खडकी पोलीस करत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.