Yerwada : चोरीचे प्रकार काही थांबेचना, येरवड्यात आणखी 3 दुकाने फोडली

3 more shops were blown up in Yerwada

एमपीसी न्यूज – पुणे शहरात मागील काही दिवसांपासून सातत्याने घरफोड्यांचे प्रकार होताना दिसतअसून​ ​चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र सध्या सर्वत्र आहे. या चोरट्यांना रोखण्यात पुणे पोलीस काही​से कमी पडताना दिसत आहेत. कारण पुण्यातील येरवडा परिसरात चोरट्यांनी आणखी 3 दुकाने फोडली आहेत. त्यामुळे पुणेकरांमध्ये एक प्रकारचं दहशतीचे वातावरण आहे. 

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी माधव वरकडे यांचं येरवड्यातील शास्त्रीनगर मध्ये मेडिकल शॉप आहे. मंगळवारी मध्यरात्री ते नेहमीप्रमाणे दुकान बंद करून घरी गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुकानात आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आलं. चोरट्यांनी त्यांच्या दुकानातच शटर उचकटून 27 हजार रुपयांची रोकड सोडून नेली होती. याव्यतिरिक्त नागपूरचाळ परिसरात असणाऱ्या आणखी एका दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी गल्यातील रोख तीन हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी लक्ष्मण पमनानी यांनी तक्रार दिली. याशिवायवाय येरवडा परिसरातील आणखी एका मोबाईल शॉपीचे शटर उचकटण्याचाही चोरट्यांनी प्रयत्न केलाय.

दरम्यान या तिन्ही घटना प्रकरणी येरवडा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.