Yerwada Crime News :- अल्पवयीन मुलाने दहशत पसरविण्यासाठी पाच वाहने फोडली

एमपीसीन्यूज : दहशत पसरविण्यासाठी दोघांनी तरूणावर खूनी हल्ला करीत 5 वाहनांची तोडफोड केल्याची घटना येरवड्यातील रामनगर कमानीजवळ घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे.

मैनुदिन शेख (वय 21, रा.रामनगर, येरवडा) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मैनुदिन काल जेवण करून मित्राला भेटण्यासाठी रामनगर कमानीजवळ थांबले होते. त्यावेळी तेथे आलेल्या दोघांनी कारण नसतानाही मैनुदिनला पालघनने मारहाण करून जखमी केले.

त्याशिवाय परिसरात दहशत पसरविण्यासाठी हॉटेलसमोर असलेल्या 5 वाहनांची तोडफोड केली.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक बलभीम ननवरे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.