Yerwada: गुंडाच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात पोलीस कर्मचारी जखमी

एमपीसी न्यूज – गुंडांच्या टोळक्याने केलेल्या हल्ल्यात गस्तीवर असलेला पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. या संदर्भात काल (मंगळवारी) मध्यरात्री येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील युनिट चारमधील पोलीस कर्मचारी सागर घोरपडे हे गुंडांच्या हल्ल्यात जखमी झाले. काम मध्यरात्री घोरपडे गस्तीवर असताना सहा-सात जणांच्या टोळक्याकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. हल्लेखोर हे एका गुन्ह्यातील आरोपी असल्याचे समजते. जखमी घोरपडे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांवरील या हल्ल्याची पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली असून पोलीसच सुरक्षित नसतील तर सामान्य पुणेकरांचे काय, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.