Pimpri : होय, शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर – आयुक्त हर्डीकर  

एमपीसी न्यूज  – पिंपरी-चिंचवड शहरात भटकी कुत्री, डुक्करांचा प्रश्न गंभीर आहे. तो प्रश्न शहरवासियांना भेडसावत असून नागरिकांना त्याच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्य केले. तसेच प्रशासन कुत्री आणि डुक्करांचा बंदोबस्त लावण्याचे काम करत आहे. अधिक योग्य पद्धतीने काम करण्याचे निर्देश अधिका-यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान,  याबाबत तोडगा काढण्यासाठी महापौर राहुल जाधव येत्या शुक्रवारी (दि.21) आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाची संयुक्त बैठक घेणार आहेत.  

पत्रकारांशी बोलताना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, शहराच्या विविध भागात भटकी कुत्री, डुक्करांचा उपद्रव वाढला आहे. त्याचा नागरिकांना त्रास होत असून पालिका कुत्र्यांच्या बंदोबस्त करण्याचे काम करत आहे. वराह पालन करणा-यांवर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. पालिकेकडून कुत्र्यांची नसबंदी केली जात आहे. गतवर्षी बारा हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण केले आहे. निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्याला आहे त्याच ठिकाणी सोडण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे काही अडचणी येत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

कुत्र्यांच्या निर्बिजीकरणासाठी तीन संस्थाची नेमणूक केली आहे. त्यापैकी एका संस्थेच्या कामाबाबत तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे त्यांचे काम थांबविले असून नवीन संस्थेची नेमणूक केली जाणार आहे. सध्या दोन संस्था कार्यरत आहेत. या संस्थांना अधिका चांगल्या रितीने काम करण्याचे निर्देश दिले आहेत. डुक्कर पकडण्यासाठी ठेकेदार मिळत नाही. त्या कामासाठी ठेकेदार नेमला जाणार असून पुढील महिन्यापर्यंत त्याची निविदा प्रसिद्ध केली जाणार आहे. मोकाट जनावरे पांजरपोळमध्ये दिली जातात. तसेच मोकाट जणावरांसाठी चिखलीत जागेचे आरक्षण असून ते विकसित केले जाणार असल्याचेही, आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण दगडे यांनी नगरसेवक, नागरिकांचे फोन उचलणे आवश्यक आहे. त्याबाबत तशा सूचना त्यांना दिल्या आहेत. फोन उचलत नसतील तर त्यांची चौकशी करुन कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, महापौर राहुल जाधव यांनी देखील डॉ.  डॉ. अरुण दगडे यांना फैलावर घेतले. नगरसेवक, नागरिकांच्या फोन उचलण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाची संयुक्त बैठक महापौर घेणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.