Yevat Hotel Fire News : यवत येथील कांचन व्हेज  हॉटेलला भीषण आग  

एमपीसीन्यूज :  पुणे -सोलापूर  महामार्गावरील यवत येथील कांचन व्हेज या हॉटेलला आज दुपारी भीषण आग लागली. या घटनेची वर्दी मिळताच पीएमआरडीएचे  दोन, एमआयडीसी  आणि   दौंड नगरपरिषदेच्या प्रत्येकी एक अशी  चार  अग्निशमन वाहने घटनास्थळी दाखल झाली असून  आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले आहे.  सध्या अग्निशन दलाचे जवानांकडून कुलिंगचे काम सुरू आहे.

 

दरम्यन, हॉटेल कर्मचाऱ्यांकडून मिळलेल्या माहितीनुसार हॉटेलमध्ये  जेवण बनवत असताना तडक्याची आग वर गेली. यामुळे  छताच्या  चटईला आग लागली. त्यानंतर काही क्षणात आग सर्वत्र परसरली. आगीचे लोट दूरवर दिसू लागले होते.  तसेच महामार्गालागत बघ्यांचीही गर्दी जमली होती.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.