-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Dabhade News : योगासने व प्राणायम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक : योगसाधक दत्तात्रय भसे

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज  – 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरा केला जातो. कोरोना महामारीच्या काळात सर्वांनाच योगविद्येचे महत्त्व पटलेले आहे. जागतिक योग दिनाचे औचित्य साधून या योगदिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, दि. 20 जून 2021 रोजी सायं. ठीक पाच ते सहा या कालावधीत अभंग इंग्लिश मीडियम स्कूल तर्फे पालक व विद्यार्थ्यांसाठी सुखी समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली- योगसाधना या विषयावर आभासी पद्धतीने म्हणजेच झूम लिंक द्वारे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 

श्रीक्षेत्र देहू येथील योगविद्याधाम केंद्राचे प्रमुख योगसाधक, गुरुवर्य दत्तात्रय भसे यांनी सुखी समृद्ध जीवनाची गुरुकिल्ली-योगसाधना या विषयावर मार्गदर्शन करताना ओंकाराचे शास्त्रीय दृष्ट्या महत्त्व समजावून सांगत शास्त्रशुद्ध पद्धतीने ओंकार कसा म्हणावा याचे प्रात्यक्षिक करून दाखवले.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

मनाच्या गतीवर ताबा मिळवून शरीर स्थिर कसे ठेवावे याचा उत्तम मार्ग म्हणजे योग. मनाचे सामर्थ्य, मनाची एकाग्रता, मनशांती, आकलन क्षमता, निर्णय क्षमता, ग्रहण क्षमता यासाठी योगासने व प्राणायाम हे सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत पूरक आहेत असे भसे सरांनी नमूद केले.

तसेच याप्रसंगी योगसाधक  राहुल जाधव सर यांनी अष्टांग योगमार्गाने आपले शरीर सुदृढ, व्याधीमुक्त होते व मन विशुद्ध होते. इतर व्यायाम प्रकारांमध्ये शरीरावर भर दिला जातो पण योगाभ्यासात मन व शरीर या दोघांची सांगड घातली जाते असे मार्गदर्शन केले.

योगशिक्षक  संकर्ष  राजमाने यांनी सूर्यनमस्कार व इतर अनेक योगासनांची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके करून दाखविली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अभंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्य डॉ. कविता अय्यर यांनी केले व सहशिक्षिका योगिता नांगरे यांनी सूत्रसंचालन केले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.