Pimpri : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवकच्या कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड

एमपीसी न्यूज – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेषत: युवकांची संघटना बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांनी स्वतः लक्ष देण्यास सुरूवात केली आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे निष्ठावान उद्योजक पंडीत गवळी यांचा मुलगा योगेश गवळी यांना पिंपरी चिंचवड शहर युवकच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे.

पुणे येथे अजितदादांच्या उपस्थितीत बुधवार (दि.9) पिंपरी चिंचवडच्या आजी-माजी नगरसेवकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी महापालिकेत चाललेल्या चुकीच्या कामावर अंकुश ठेवण्यात व बुथ कमिटी नेमण्यात युवकांनी जास्त योगदान देण्याचे सांगितले. निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी पक्षाचे जीव तोडून काम करणारे युवक कार्यकर्ते एकत्र करण्याची जबाबदारी युवकांची आहे. त्यामुळे शहराध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या बरोबर काम करण्यासाठी युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची निवड केली आहे. योगेश गवळी यांनी शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त संपुर्ण शिरुर लोकसभा मतदारसंघात प्लेक्सबाजी करुन तरुणांमध्ये एक युवा वादळ उठवल्यामुळे पक्षांने त्यांची निवड केली असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, प्रशांत शितोळे, वैशाली काळभोर, नाना काटे, पंडीत गवळी, माजी नगरसेवक जालिंदर शिंदे, माजी आमदार विलास लांडे, आण्णा बनसोडे, विशाल वाकडकर, विरोधी पक्षनेते दत्ता साने, संजय वाबळे आदि सर्व विद्यमान नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते.निवडीनंतर योगेश गवळी म्हणाले की, शहराचा विकास हा केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून झाला आहे. विकास साधण्याची धमक केवळ राष्ट्रवादीमध्ये आहे. पक्षाच्या हितासाठी नाराजी बाजूला ठेवून एकदिलाने काम करण्याचा युवकांचा प्रयत्न राहील. तसेच युवकांचे संघटबन मजबुत करण्यासाठी शहर राष्ट्रवादी युवकच्या माध्यमातुन प्रयत्न करणार असल्याचे मत व्यक्त केले. आता युवक कार्याध्यक्षपदी योगेश गवळी यांची नियुक्ती केल्यामुळे भोसरी विधानसभा मतदारसंघात पक्षात आलेली मरगळ दूर होण्यात नक्कीच मदत होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.