Talegaon : योगिनी कर्वे यांचे निधन
एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील वारकरी संप्रदाय आणि अध्यात्मिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या योगिनी श्रीकृष्ण कर्वे (वय 85) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पती, तीन मुलगे,तीन मुली,सुना ,नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
जागतिक कीर्तीचे ज्योतिषी श्रीकृष्ण कर्वे गुरुजी यांच्या पत्नी तर सामाजिक कार्यकर्ते मिलिंद,संजय, संदीप यांच्या त्या मातोश्री होत.