Hinjawadi : लग्नाच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार केला. पीडित तरुणीने तरुणाच्या घरच्यांकडे धाव घेतली असता त्यांनी देखील तरुणीला अपमानास्पद वागणूक दिली. ही घटना 2013 ते 16 जून 2019 या कालावधीत म्हाळुंगे येथे घडली.

पवन कटियारसिंग सिसोदे (वय 26), कटियारसिंग सिसोदे (वय 50) आणि अन्य एका महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 27 वर्षीय पीडित तरुणीने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि पवन एकाच कंपनीत काम करतात. त्यादरम्यान त्यांच्यात मैत्री झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पवन याने पीडित तरुणीशी विवाह न करता तिच्यासोबत वेळोवेळी शरीर संबंध प्रस्थापित केला. दरम्यान, पीडित तरुणीचा गर्भपात देखील केला. पवन याने वारंवार लग्नासाठी टाळाटाळ केली. यामुळे पीडित तरुणीने पवनच्या घरच्यांकडे धाव घेतली. घरच्यांनी देखील तिला शिवीगाळ करून हाकलून दिले. तसेच पुन्हा पवनचे नाव घेतल्यास तिला जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तिने हिंजवडी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.