Hinjawadi : गोदामातील गार्बेजच्या खोलीत तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज – गोदामातील गार्बेजच्या खोलीत लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन तरुणीने आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी) सकाळी सहाच्या सुमारास हिंजवडी फेज दोन येथे उघडकीस आली. 

हसीना पटेल (वय 18, रा. हिंजवडी फेज दोन, मूळ रा. कर्नाटक), असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हसीनाचे वडील हिंजवडी येथील मॅगीच्या वितरकाकडे रखवालदार म्हणून काम करत आहेत. गोदामाशेजारी पटेल कुटुंब राहण्यास आहे. आज पहाटे हसीनाचे आई आणि वडील दोघेही कामावर गेले. तिच्या भावाने गोदामाचे शटर उघडले असता हा प्रकार उघडकीस आला. हसीनाने गोदामातील एका लोखंडी रॉडला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.