Purandar : मराठा आरक्षणासाठी तरुणाची रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या

एमपीसी न्यूज – पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथील दत्तात्रय शिंदे या 34 वर्षीय तरुणाने जेजुरी जवळ रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. आत्महत्येनंतर दत्तात्रय शिंदे यांच्या खिशात चिठ्ठी सापडली. ज्यामधे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते, असे दत्तात्रय शिंदे यांच्या नातेवाईकांनी सांगितले आहे. 

जेजुरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत दत्तात्रय शिंदे यांनी पुणे -कोल्हापूर लोहमार्गावरील दौडज खिंडीत रेल्वेखाली शुक्रवारी सकाळी 6.22 वाजण्याच्या सुमारास आत्महत्या केली.

मयत दत्तात्रय याच्या खिशात एक पत्र सापडले असून त्यात म्हटले आहे की जर पाच ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षण नाही मिळाले तर मी जलसमाधी घेईन. पण त्याने आज आत्महत्या का केली हे कळू शकले नाही. मयत दत्तात्रय यांच्या पश्चात चार वर्षाचा मुलगा आणि पत्नी आहे. तो टुरिस्ट गाडी चालवत होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.