Whatsapp News Today : समोरच्या व्यक्तीच्या नकळत तुम्ही त्याचे स्टेटस पाहू शकता.

एमपीसी न्यूज : आपल्या मनातील गोष्ट  इतरांसोबत शेयर करण्यासाठी अनेकजण व्हॉट्सअॅप स्टेटसचा वापर करतात. अगदी समोरच्या व्यक्तीचा मूड कसा आहे याचा अंदाजही स्टेटसवरील फोटो आणि व्हिडिओ पाहून आपल्याला बांधता येतो. 2018 साली कंपनीने लॉंच केलेले स्टेटस हे फीचर आज सर्वात लोकप्रिय आहे.

आपण एखाद्या व्यक्तीचे स्टेटस पाहिल्यानंतर त्या व्यक्तीच्या व्हूज लिस्टमध्ये आपले नाव येते. त्यामुळे स्टेटस कुणीकुणी पाहिले हे त्याला आपोआप समजते. त्यामुळे सेटिंग्समध्ये काही सोपे बदल करून एखाद्या व्यक्तीच्या नकळतही तुम्ही त्याचे स्टेटस पाहू शकता.

वापरा ही सोपी ट्रिक

  • सुरुवातीला व्हॉट्स अॅप ओपन करून सेटिंग्स ऑप्शनमध्ये जा.
  • तिथे गेल्यावर प्रायव्हसी ऑप्शनवर क्लिक करा.
  • रीड रिसीप्टवर क्लिक करून ते ऑप्शन ऑफ ठेवा.
  • त्यानंतर समोरच्या व्यक्तीच्या नकळत तुम्ही त्याचे स्टेटस पाहू शकता.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.