Pune : डेबिट कार्ड व ओटीपीची माहिती मिळवून युवकाची 51 हजाराची फसवणूक

एमपीसी न्यूज – कोंढवा येथील एका युवकाच्या डेबिट कार्ड क्रमांक आणि ओटीपीची माहिती मिळवून त्याच्या बँक खात्यातील 51 हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. ही घटना दि. 4 मे रोजी ऑनलाईन माध्यमाद्वारे घडली.

याप्रकरणी कुणाल शहा (वय 19, रा. कोंढवा बुद्रुक), याने फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कुणाल याने खात्यात भरण्यासाठी दिलेला एक लाख रुपयांचा धनादेश हा का वटला नाही, याची माहिती घेण्यासाठी कस्टमर केअरला फोन केला. यावेळी त्यांच्याकडून समोरील मोबाईल धारकाने कुणालचा खाता क्रमांक तसेच डेबिट कार्डचा सोळा अंकी क्रमांक मागितला. त्यानंतर त्याचे खाते काही वेळात सुरू होईल असे सांगून त्यांच्याकडून ओटीपी नंबर शेअर करून घेतला. कुणाल याने ओटीपी दिल्यानंतर काही वेळातच त्याच्या बँक खात्यातील 51 हजार 400 रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केली.  पोलीस निरीक्षक एम एस कुंभार पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.