Chikhali : पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाल्याचे सांगत तरुणीची 64 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज – पेटीएम अकाउंटचे केवायसी सस्पेंड झाले आहे. ते जनरेट करण्यासाठी तरुणीच्या आणि तिच्या बहिणीच्या बँक खात्याची लिंकद्वारे माहिती घेऊन 64 हजार 397 रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार रविवारी (दि. 23) दुपारी पूर्णानगर चिंचवड येथे घडला.

वरिषा अफाहामउद्दीन खान (वय 18, रा. पूर्णानगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 9382300928 या मोबाईल धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने 9382300928 क्रमांकावरून फिर्यादी यांना फोन केला. ‘तुमचे पेटीएम अकाउंट नंबरचे केवायसी सस्पेंड झाले आहेत .ते जनरेट करावे लागेल. यासाठी आरोपीने https://d74343a1.ngrok.iopaytm.com ही लिंक पाठवून त्यावरून फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीच्या डेबिट कार्डची माहिती मिळवली. फिर्यादी यांच्याकडून सीव्हीव्ही नंबर व ओटीपी घेऊन त्याद्वारे बँक खात्यातून 64 हजार 397 रुपये काढून घेतले. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.