Pune News : दुचाकीवरील तरूणीचा विनयभंग, कार चालका विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज : तुला हॉर्न वाजवला कळत नाही का असे म्हणतात एका कार चालकाने 25 वर्षीय तरुणीचा दुचाकीवर डोके आढळून विनयभंग केला. पुण्यातील हंडेवाडी रस्त्यावर आठ ऑक्टोबर रोजी ही घटना घडली. 25 वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून तीस वर्षीय कारचालक विरोधात विनयभंग आणि मारामारीचा वानवडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आठ ऑक्टोबर रोजी हांडेवाडी रस्त्याने दुचाकीवरून जात होती. यावेळी पाठीमागून स्कोडा कार मध्ये आलेल्या तरुणाने तिला थांबवले. आणि त्याने तुला हॉर्न वाजवलेला कळत नाही का ? अशी विचारणा करत शिवीगाळ केली. फिर्यादी तरुणीने काय झाले अशी विचारणा केल्यानंतर आरोपीने तिचे डोके दुचाकीच्या हँडलवर आदळले आणि मारहाणही केली त्यानंतर आरोपी निघून गेला.
या सर्व प्रकारानंतर फिर्यादी तरुणी घाबरली होती त्यानंतर तिने वानवडी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III