Nigdi: आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय टुर्स बुकिंगच्या नावाखाली 34 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टुर्स बुकिंग करण्याचे अमिष दाखवून एकाने महिलांची 34 लाखांची फसवणूक केली. हा प्रकार निगडी येथे 28 एप्रिल ते 5 जून 2019 या कालावधीत घडला.

मोहित संजय पांडोह (रा. मोहल्ला, आचारजिया पिंपल वाली गल्ली, जम्मु-काश्मीर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अरूंधती किरण रहाणे (वय 32, रा. स्टारव्हिव बिल्डिंग, आळंदी-देहू रोड, मोशी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी व त्यांच्या काही मैत्रिणीला आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय टुर्स बुकिंग करून देण्याचे अमिष दाखविले. त्यासाठी त्यांच्याकडून 33 लाख 78 हजार 400 रूपये बॅक खात्यावर भरण्यास भाग पाडले. टुर्सचे नियोजन न करता त्यांची फसवणूक केली. निगडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.