Pune : जबरदस्तीने मोबाईल हिसकावल्या प्रकरणी युवकाला अटक

एमपीसी न्यूज – पादचारी महिलेच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावणा-या युवकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी (दि.27) रात्री नऊ वाजता घडली.

_MPC_DIR_MPU_II

सुरेशकुमार मच्छामार मेगवाल (वय 23, रा. बालाजीनगर धनकवडी, पुणे), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका 21 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला घरापासून जवळ असलेल्या ममता स्वीट मार्ट बालाजीनगर येथून सॉस घेऊन पायी येत होत्या. यावेळी आरोपी सुरेश याने पाठीमागून येऊन त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. महिलेने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.