Bhosari : शस्त्र विक्रीसाठी आलेल्या तरुणाला अटक

तीन पिस्टल, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज – शस्त्र विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी तीन पिस्टल, एक गावठी कट्टा, चार जिवंत काडतुसे असा शस्त्रसाठा जप्त केला आहे.

रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील (वय 28, रा. फुगे आळी, भोसरी. मूळ रा. धुळे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिस शिपाई गणेश पंढरीनाथ सावंत यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलिसांना मंगळवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास माहिती मिळाली की, पांजरपोळ शेजारील मोकळ्या मैदानात एक तरुण संशयितरित्या थांबला आहे. त्याच्याकडे पिस्तूल आहे. या माहितीनुसार, पोलिसांनी परिसरात सापळा रचून रुपेश याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे तीन पिस्टल, एक गावठी कट्टा आणि चार जिवंत काडतुसे असा एकूण 1 लाख 75 हजार 800 रुपयांचा शस्त्रसाठा आढळून आला. पोलिसांनी हा शस्त्रसाठा जप्त करत त्याला अटक केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.