Pune Crime News : येरवड्यात मित्राच्या बहिणीची छेड काढल्याच्या वादातून  तरुणावर प्राणघातक हल्ला

एमपीसी न्यूज : मित्राच्या बहिणीची छेड काढल्याचा वादातून एका  21 वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करण्यात आलाय. येरवड्यातील लाईक नगर येथील सेवालाल चौकात हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. 

शुभम शिवा पवार (वय 21,सेवालाल चौक, जय जवान नगर, येरवडा) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे याप्रकरणी दर्शन रूपसिंग राठोड (वय 19) आणि लाल्या उर्फ रवी गोविंद चव्हाण (वय 30) यांच्यासह आणखी दोघांवर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दर्शन राठोड याने काही दिवसांपूर्वी फिर्यादी शुभम पवार याच्या मित्राच्या बहिणीची छेड काढली होती. त्यावरून त्यांच्यात भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून आरोपी दर्शन राठोड याने इतर साथीदारांच्या मदतीने शुभम पवार याच्यावर जीवघेणा हल्ला केला.

शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास शुभम पवार हा येरवड्यातील सेवालाल चौकात उभा होता. यावेळी आरोपीने त्याच्या डोक्यात कोयत्याने वार केले. तसेच लाकडी दांडक्याने मारहाण करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांना अटकही केली आहे अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.