Wakad : नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने तरुणाला मारहाण

Young man beaten for having a love affair with relative.

एमपीसी न्यूज – नातेवाईक तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याने दोघांनी मिळून एका तरुणाला बेदम मारहाण केली. तसेच पाहून घेण्याची धमकी दिली. ही घटना बुधवारी (दि. 26) सकाळी साडेदहा वाजता ताथवडे येथील राज स्नॅक्स सेंटर येथे घडली.

प्रवीण बोबडे (रा. चिंचवडे नगर, चिंचवड), अजित वाघमोडे (रा. वेताळनगर, चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी ऋषिकेश अशोक चपाले (वय 21, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रवीण याच्या नातेवाईक तरुणीसोबत फिर्यादी ऋषिकेश याचे प्रेमसंबंध असल्याचे आरोपी प्रवीण याला समजले. त्याने आणि त्याच्या मित्राने मिळून फिर्यादी ऋषिकेश यांना ताथवडे येथील राज स्नॅक्स सेंटर येथे गाठले.

आरोपींनी ऋषिकेश यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच प्रवीण याने बेल्टने मारून ऋषिकेश यांना जखमी केले. नातेवाईक तरुणीच्या नादाला लागल्यास तुझ्याकडे पाहून घेतो, अशी आरोपीने धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.