Pune News : विरोधी टोळीसोबत राहतो म्हणून सराइताकडून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज : विरोधातल्या टोळीसोबत राहत असल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने एका तरुणाला बेदम मारहाण केली. यातील दोघे जण हे सराईत गुन्हेगार आहेत. स्वारगेट पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इंदिरानगर झोपडपट्टी मध्ये हा प्रकार घडला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करीत चौघांना अटक केली आहे. 

हसन उर्फ अच्यु रमजान शेख, अश्पाक मुन्ना शेख, सुलतान करीम शेख आणि आलम अशपाक शेख अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. यातील अशपाक आणि सुलतान पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. याप्रकरणी सौरभ मारुती कसबे याने स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 19 जून च्या रात्री फिर्यादी तरुण हा इंदिरानगर झोपडपट्टी परिसरातील वाडेकर हॉस्पिटल समोरून जात होता. यावेळी आरोपींनी त्याला पाहिले आणि हा त्यांचे वाद सुरू असणाऱ्या तरुणांसोबत राहत असल्याच्या कारणावरून त्याला शिवीगाळ केली. हा सुद्धा त्यांच्यातच असतो याचाही आपण काटा काढू असे म्हणून हसल शेख यांने फिर्यादीच्या दिशेने दगड मारला. हा दगड फिर्यादीच्या नाक आणि डोळे याच्या वर लागला असून फिर्यादी जखमी झाला आहे. तर इतर आरोपींनी त्याला हाता बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.