Pimpri : दारूसाठी पैसे न दिल्याने तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज – दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून तरुणाला मारहाण करण्यात आली. ही घटना मोरवाडी, पिंपरी येथे सोमवारी (दि. 24) रात्री घडली.

कुंदन उमेश गायकवाड (वय 19, रा. लालटोपीनगर, पिंपरी), असे मारहाणीत जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून त्यांनी याप्रकरणी मंगळवारी (दि. 25) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, किरण महेंद्र मोरे (वय 24, रा. लालटोपीनगर, मोरवाडी, पिंपरी) आणि सोमनाथ (पूर्ण नाव, पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास फिर्यादी गायकवाड यांच्याकडे आरोपींनी दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपींनी गायकवाड यांना मसाला वाटण्याच्या दगडी पाट्याने डोक्‍यात मारहाण करून जखमी केले. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.