Bhosari : जेवणाचा खर्च न दिल्याने तरुणाला मारहाण

Young man beaten for not paying for meals.

एमपीसी न्यूज – मित्राच्या रूममध्ये ठरल्याप्रमाणे जेवणाचा खर्च न देता तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 24) रात्री आठ ते दहा या कालावधी खंडोबा माळ भोसरी येथे घडला.

राजाभाऊ उर्फ राजू अशोक पवार (वय 28, रा. खंडोबामाळ, भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी साजन शेलार (वय 31, रा. खंडोबामाळ, भोसरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. शुक्रवारी फिर्यादी यांचा मित्र आव्या याच्या रूममध्ये आरोपी साजन याने जेवणाचा खर्च द्यायचा असे त्यांच्यात ठरले होते.

ठरल्याप्रमाणे साजन याने जेवणाचा खर्च दिला नाही. तसेच साजन याने उलट फिर्यादी यांच्याकडे खर्चाची मागणी केली.

त्यासाठी साजन याने फिर्यादी यांना शिवीगाळ करून गचांडी पकडून चाकुने पाठीवर व उजव्या पायावर मारून जखमी केले.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.