BNR-HDR-TOP-Mobile

Hinjawadi : लोखंडी खिळे न दिल्याने तरुणाला बेदम मारहाण; दोघांना अटक

एमपीसी न्यूज – कंपनीच्या बसमध्ये चढत असताना चार जणांनी मिळून तरुणाला लोखंडी खिळे मागितले. तरुणाने आपल्याकडे खिळे नसल्याचे सांगितले. यावरून चार जणांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी (दि. 22) रात्री कोकाटे वस्ती बावधन येथे घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.

सुशील आनंद शिंदे, करण ज्ञानदेव मडके (रा. बावधन) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह त्यांच्या इतर दोन साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शशिकांत श्रीप्रधान तिवारी (वय 20, रा. बावधन खुर्द) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शशिकांत बिगारी काम करतात. ते गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास कंपनीच्या बसमधून जात होते. बसमध्ये चढत असताना आरोपी सुशील याने शशिकांत यांच्याकडे लोखंडी खिळे मागितले. ‘माझ्याकडे लोखंडी खिळे नाहीत’ असे सांगितल्यावरून आरोपींनी शशिकांत यांना मारहाण केली. तसेच बसच्या काचा फोडून नुकसान केले. यामध्ये शशिकांत गंभीर जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

Advertisement

Advertisement

You might also like