Chikhali : ट्रकच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने पादचारी तरुणाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 10) सायंकाळी सातच्या सुमारास मोरेवस्ती चिखली येथे घडली.
सुनील भागवत शिंदे (वय 22), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी संजय भागवत शिंदे (वय 34, रा. चिखली. मूळ रा. मिरगवन, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री सुनील मोरेवस्तीमधील अंगणवाडी कॉलनीतून जात होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने सुनीलला धडक दिली. यामध्ये सुनील गंभीर जखमी झाला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.