Akurdi : लोकलमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा लोकलमधून पडल्याने तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना आज, रविवारी (दि. 12) दुपारी साडेबाराच्या सुमारास आकुर्डी येथे घडली.

अक्षय रमेश हरिजन (वय 22, रा. सोमाटणे फाटा), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास पुणे लोणावळा लोकलमधून जात होता. लोकलच्या दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला अक्षय लटकत होता. आकुर्डीजवळ लोकल आली असता अक्षय लोहमार्गाच्या बाजूला असणा-या रेल्वेच्या इलेक्ट्रिक खांबाला धडकला. चालू लोकलमध्ये हा प्रकार झाला. यामुळे इलेक्ट्रिक खांबाला धडकून अक्षय खाली पडला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. रेल्वे पोलिसांनी त्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.