Pimpri : पाण्याची मोटर काढताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाण्याची मोटर काढत असताना शॉक लागून तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 25) दुपारी पिंपरी येथे घडली. विजय रमेश नवले (वय 32, रा. भाटनगर, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास विजय हे पाण्याची मोटर काढत होते. त्यावेळी त्यांना विजेचा शॉक लागला. यामध्ये विजय गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले. ज्या ठिकाणी विजय यांची पाण्याची मोटार होती. त्याखाली इतर विजेच्या केबल गेल्या होत्या. पावसामुळे येथील परिसर ओला झाल्यामुळे त्यात वीज प्रवाह उतरून शॉक लागल्याची शक्‍यता विजय यांच्या नातेवाईकांनी व्यक्‍त केली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.