Chinchwad : कार-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – कार आणि दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी झाला.

गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मु.पो. मोई, ता. हवेली, जि. पुणे), असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केएसबी चौकातून चिंचवड स्टेशनकडे येणा-या मार्गावरून गोरख दुचाकीवरून येत होते. गोरख यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने ते घसरत जाऊन पुढील कारला धडकले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या गोरख यांना पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

अपघात झाल्यानंतर त्यांच्याकडे ओळख पटणारा कोणताही पुरावा पोलिसांना आढळला नाही. मात्र, काही वेळाने त्यांच्या मित्राचा फोन गोरख यांच्या फोनवर आला आणि गोरख यांची ओळख पटली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.