Pune News : पुणे-नगर रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : पुणे नगर रस्त्यावर अज्ञात वाहनाने रात्रीच्या सुमारास धडक दिल्यामुळे 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. पुणे-नगर रस्त्यावरील जुना जकात नाका येथील हॉटेल मराठा दरबार समोर 11 फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला. 

_MPC_DIR_MPU_II

प्रमोद तानाजी शिवरामजी (वय 20) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी नरेश मनोहरराव निटूरे (वय 32) यांनी फिर्याद दिली असून विमानतळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाने विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की 11 फेब्रुवारी च्या रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास प्रमोद शिवरामजी हा करून जुना खरडी नाका येथील हॉटेल मराठा दरबार समोर असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावरून जात होता. यावेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनचालकाने त्याला जोराची धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने प्रमोद चा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.