Pune – उसने दिलेले पैसे मागिल्यावरुन तरुणावर वार

एमपीसी न्युज – उसने दिलेले पैसे मागितल्याने चाकूने वार करुन एकाला गंभीर जखमी केले आहे. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री 11च्या सुमारास दत्तवाडी येथील निलायम ब्रीजवरती घडली.

सुबरोजीत देवराज नंदी उर्फ सोनू( वय 20) असे अटक करण्यात आलेल्या इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चमन धरम सिंग (वय 30, रा. पर्वती) यांनी कुंथल ब्रम्हचारी उर्फ पप्या(वय 19, रा. दत्तवाडी) व सुबरोजीत देवराज नंदी उर्फ सोनू( वय 20) यांना उसनवारीने पैसे दिले होते.  चमन यांनी उसने दिलेले पैसे परत मागितले असता आरोपीनीं मारहाण करून तसेच पोटात चाकू मारून चमन यांना गंभीर जखमी केले आहे.
याप्रकरणी एकाला अटक केली असून पुढील तपास दत्तवाडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.