Pune News : जर्मन बेकरीसमोर इलेक्ट्रिक डीपीत हात घातल्याने तरुणाचा तडफडून मृत्यू

एमपीसी न्यूज : पुण्यातील लाँ कॉलेज रस्त्यावरील जर्मन बेकरीसमोर असणाऱ्या एका इलेक्ट्रिक डीपीत दोन्ही हात घातल्यामुळे एका तरुणाचा जागीच तडफडून मृत्यू झाला. किरण राजकुमार (वय 32, रा.त्रिवेंद्रम, केरळ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आत्महत्या केल्याचा संशय आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, जर्मन बेकरीसमोरील फुटपाथवरून किरण दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चालला होता. यावेळी तो स्वतःसोबतच बडबडत करत होता. यावेळी त्याने समोर आलेल्या एका इलेक्ट्रिक डीपीत अचानकपणे दोन्ही हात घातले. फ्यूजला लावलेल्या तारांना धक्का लागल्याने त्याला जोराचा करंट बसला आणि तो दूरवर फेकला गेला. त्यानंतर बराच वेळ तो रस्त्यावर तडफडत होता. स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याची माहिती दिली. त्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल केले. तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.

घटनास्थळी पोलिसांना त्याचा बंद अवस्थेतील मोबाईल सापडला. याशिवाय त्याच्याकडे आरसी बुक आणि कागदपत्रे देखील होती. त्यावरून त्याची ओळख पटली. स्विच ऑफ असलेला त्याचा मोबाईल चार्जिंग केल्यानंतर पोलिसांनी शेवटी फोन केलेल्या नंबरवर फोन लावला. तो नंबर त्याच्या वडिलांचा होता. पोलीसांनी घटनेची माहिती त्यांना सांगितली.

किरण राजकुमार हा मूळचा केरळचा होता. त्रिवेंद्रम येथील एका महाविद्यालयात तो उपप्राचार्य पदावर काम करत होता. परंतु काही दिवसांपूर्वीच त्याला कामावरून कमी करण्यात आले होते. तेव्हापासून तो फिरत होता.  दरम्यान त्याचे नातेवाईक मृतदेह ताब्यात घेण्यासाठी केरळवरून निघाले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.