wakad : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी वाकड येथे घडली.

अमोल अंबादास खराटे (वय २८, रा. राधाकृष्ण कॉलनी, माऊली चौक, वाकड), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

अमोल यांनी गुरूवारी सकाळी सव्वाअकरा वाजताच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेतला. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. वाकड पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.