Dehu gaon : रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला बेदम मारहाण, तरुणाच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव

एमपीसी न्यूज – रिक्षाला धक्का लागला म्हणून तरुणाला सहा जणांनी बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत तरुणाच्या पोटात अंतर्गत रक्तस्त्राव झाला आहे. (Dehu gaon) हि घटना देहुगाव येथील भैरवनाथ चौक येथे शुक्रवारी (दि.24) सकाळी घडली.
याप्रकऱणी कृष्णा राजाराम शिंदे (वय 22 रा.तळवडे) यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून श्रीराम देशमुख (वय 30 ते 32), राम भोसले, रोहित वाघ, विष्णू वाघ, विजय सुर्वे, रिक्षा चालक व त्याची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.
Bhosari News : पाठलाग करत महिलेचा विनयभंग करणाऱ्यावर गुन्हा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांच्या दुचाकीवरून भंडारा डोंगर येथे नातेवाईकांकडे जात होते. यावेळी देशमुख याच्या रिक्षाला फिर्यादीच्या गाडीचा धक्का लागला.(Dehu gaon) त्याने इतर साथीदारांना बालावून घेत फिर्यादीला शिवीगाळ करत लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या मारहाणीत फिर्यादी यांच्या पोटात अंतर्गत रक्त स्त्राव झाला आहे. यावरून देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.