Mhalunge : तरुणाच्या डोक्याला बंदूक लावून लुटले

एमपीसी न्यूज – तंबाखू मागण्याच्या बहाण्याने तरुणाच्या (Mhalunge) डोक्याला बंदूक लावून लुटण्यात आले. हा प्रकार कुरळी येथे 8 मे रोजी घडला असून म्हाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दोघाना अटक केली आहे.

याप्रकरणी जयराम भौरा मुंडा (वय 28 रा.कुरुळी) यांनी बुधवारी (दि.10) म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आदेश मदन क़ड (वय 23 रा.कडाचीवाडी, खेड) विशाल प्रकाश वाणी (वय 23 रा.कडाचीवाडी) यांना अटक केली असून अल्पवयीन मुलगा व  सत्यम कड (रा. क़डाचीवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – लेख 37 वा – मासुम जुगल हंसराज

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे रसत्याने पायी जात असतानाआरोपी दुचाकीवरून आले  व त्यांनी फिर्यादीला तंबाखू मागण्याचा बहाणा केला. फिर्यादी तंबाखू देत असताना आरोपींनी फिर्यादीचे हात पकडले व खिशातील पैसे काढण्याचा प्रय़त्न केला. फिर्यादींनी प्रतिकार केला अशता आरोपींनी थेट लोखंडी पिस्टल फिर्यादीच्या डोक्याला पिस्टल लावू ओरण बंद कर नाही तर मारून टाकीन अशी धमकी दिली. (Mhalunge) आरोपींनी फिर्यादीच्या खिशातून 700 रुपयांचा मोबाईल व 40 रुपये घेतले. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.