मंगळवार, जानेवारी 31, 2023

Nigdi News : बहिणीला त्रास देतो म्हणून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज बहिणीला त्रास देतो म्हणून तरुणाला दोघांनी मारहाण (Nigdi News) करत मारण्याची धमकी दिली. हा प्रकार सोमवारी(दि.28) ओटास्कीम निगडी येथे घडला आहे.

सलीम शेख (वय 22) व त्याचा भाऊ दोघेही राहणार ओटास्कीम यांच्या निगडी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शौकतअली गरिबउल्हा शेख (वय 40 रा. ओटोस्कीम,निगडी) यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Alandi News : प्रक्षाळपूजेनिमित्त माऊली मंदिरात समाधीवर जलाभिषेक करण्यासाठी हजारो भाविकांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा सलमान हा शेकोटी करत बसला असता आरेपी तेथे आले व त्यांनी सलमान याला तू आमच्या बहिणीला त्रास का देतोस (Nigdi News) म्हणत सिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच लोखंडी पट्टीने मारहाण करत सलमानला जखमी केले व पुढेही मारण्याची धमकी दिली. यावरून निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Latest news
Related news