Lonavala News : तुंगार्ली धरणात बुडून तरुणीचा मृत्यू 

एमपीसी न्यूज : बहिनीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठी बहिन व मैत्रिणी यांच्या समवेत आलेल्या 18 वर्षीय तरुणीचा लोणावळ्यातील तुंगार्ली धरणात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी (3 सप्टेंबर) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

ध्वनी मनिष ठक्कर (वय 18, रा. पवई, कुर्ला मुंबई) असे या मयत तरुणीचे नाव आहे. या घटनेची खबर ध्वनी हीची बहिन सुलोनी मनिष ठक्कर (वय 20) हीने लोणावळा शहर पोलिसांना दिली.

सुलोनी, ध्वनी, काम्या ठक्कर व त्यांची मैत्रिण वैष्णवी अंबाडन या चौघीजणी काम्या हीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कारने लोणावळ्यात आल्या होत्या. दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास तुंगार्ली धरण परिसरात त्यांनी काम्याचा वाढदिवसाचा केक कापल्यानंतर त्या सर्वजणी पाण्यात उतरल्या धरणातील पाण्यात खेळत असताना अचानक ध्वनी हीचा पाय घसरल्याने ती खोल पाण्यात गेली.

यावेळी सुलोनी हीने तीला हात देऊन वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र हात सटकल्याने ती खोल पाण्यात गेली. यावेळी त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केल्याने परिसरातील लोकांनी तीला पाण्यातून बाहेर काढले. मात्र नाका तोंडात पाणी गेल्याने उपचारापुर्वी तीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.