ताथवडे येथे रिक्षाच्या धडकेत तरुणी जखमी

एमपीसी न्यूज – तरुणी रस्त्याने पायी चालत जात असताना रिक्षाने तिला पाठीमागून धडक दिली. त्यात ती जखमी झाली. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सकाळी श्री बालाजी कॉलेज कॅम्पसमध्ये ताथवडे येथे घडली.

Talegaon Dabhade : तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत क्षितिजा डोके प्रथम

आकाश राजू गुप्ता (वय 23, रा. ताथवडे) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रिक्षा (एमएच 14 /एचएम 4756) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण शुक्रवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास ताथवडे येथील श्री बालाजी कॉलेज कॅम्पस मधून रस्त्याने पायी चालत जात होती. आरोपी रिक्षा चालकाने त्याच्या ताब्यातील रिक्षा भरधाव वेगात चालवून फिर्यादी यांच्या बहिणीला पाठीमागून धडक दिली. त्यात फिर्यादी यांच्या बहिणीच्या पायाला दुखापत झाली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.