Pune Crime News : घराशेजारी राहणाऱ्या तरुणाकडून बलात्कार, तरुणीच्या तक्रारीनंतर आरोपी अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून एका 23 वर्षीय तरुणीवर घराशेजारीच राहणाऱ्या तरुणाने वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 2020 ते 2021 या कालावधीत आरोपीने पीडित तरुणीची इच्छा नसताना वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आहेत.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी बलात्कार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक केली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, फिर्यादी आणि आरोपी घराशेजारीच राहतात. त्यामुळे त्यांची ओळख होती. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने पीडित तरुणीला शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी लॉजवर घेऊन जात तिची इच्छा नसतानाही तिच्या सोबत शारीरिक संबंध ठेवले. मात्र सर्व प्रकारानंतर सुद्धा ही पीडित तरुणी गप्प राहिली.

दरम्यान, तरी देखील आरोपी तिला त्रास देत राहिला. या सर्व त्रासाला कंटाळून अखेर फिर्यादीने पोलिसात तक्रार दिली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.